Maharashtra Boat Accident Special Report : तीन दिवसात 18 जणांचा बुडून मृत्यू! महाराष्ट्र हादरला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUjani Dam Accident : उजनी धरण (Ujani Dam) जलाशयात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. धरणात बोट बुडून सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनंतर सोलापूर (Solapur) जिल्हा हादरुन गेला आहे. दरम्यान, या घटनेत एका संपूर्ण कुटुंबालाच जलसमाधी मिळाली आहे. करमाळा तालुक्यातील झरे गातवातील कुटुंबाचा या घटनेत मृत्यू झालाय. पती पत्नीसह दोन चिमुरड्याचा या घटनेत अंत झालाय. दरम्यान या घटनेनंतर गावावर शोककळा पसरलीय. या घटनेनंतर अख्ख्या झरे (Zare) गावात चूल पेटली नाही. या घटनेनंतर सर्वांनाच आक्रोश आणि हुंदका दाटून आलाय.
बोट दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू
बोट दुर्घटनेची माहिती मिळतात झरे गाव आणि परिसरावर शोककळा पसरलीय. करमाळा तालुक्यातील झरे गावातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी झरे गावातील एकाच कुटुंबातील मृतांची नावे आहेत. या घटनेतून पोलीस अधिकारी राहुल डोंगरे हे वाचले आहेत. ते पोहत किनारी आल्यामुळं त्यांचा जीव वाचला आहे. तसेच अनुराग अवघडे व गौरव धनंजय डोंगरे रा. कुगाव या सर्वांचा दुर्दैवी अंत झाला आहे.