Winter Session Special Report :चर्चेची शेकोटी की आरोपांच्या ठिणग्या?अधिवेशनातून जनतेला काय मिळणार ?
abp majha web team
Updated at:
06 Dec 2023 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWinter Session Special Report :चर्चेची शेकोटी की आरोपांच्या ठिणग्या?अधिवेशनातून जनतेला काय मिळणार ? उपराजधानीत राज्याच्या राजधानीवरून, अर्थात मुंबईवरून हि वातावरण तापण्याची दाट शक्यताय.. याला निमित्त ठरलीय मुंबईतली उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद.. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि कंत्राटदारांवरून ठाकरेंनी, एकनाथ शिंदे आणि भाजपला डिवचलं होतं.. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी, उद्धव ठाकरेंच्या काळातील घोटाळ्यांची यादीच बाहेर काढणार असल्याची माहिती आहे.. कोव्हिड बॉडी बॅग घोटाळा, नालेसफाई घोटाळा, खिचडी घोटाळ्यांच्या आरोपांच्या चौकशीसाठी समितीही नेमली जाऊ शकते.. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे दोन गट मुंबईवरून थेट नागपूरच्या मैदानात आमनेसामने उभे ठाकणार आहेत..