Madhya Pradesh Special Report : प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' ऐवजी 'श्री हरी' लिहणार? काय आहे प्रकरण?
abp majha web team | 17 Oct 2022 08:11 AM (IST)
औषधाच्या प्रिस्क्रिप्शनवर RX लिहिलेलं तुम्ही पाहिलं असेल... कोणताही डॉक्टर औषध लिहून देताना मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' लिहितात आणि त्या खाली औषध लिहून देतात. त्याशिवाय औषधांच्या पाकिटावरही Rx लिहिलेलं असतं. आता मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' ऐवजी 'श्री हरी' लिहिण्याची सूचना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलीय. तसंच औषधाचे नावसुद्धा हिंदीत लिहिण्यास सांगितलं.. आपण इंग्रजीविरोधी नसून राष्ट्रभाषेबाबत जागरुकता वाढवण्याच्या बाजूने असल्याचंही त्यांनी म्हटलंय.