Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात

Continues below advertisement

Manikrao Kokate News : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि  माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाल्याप्रकरणी त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाल्यानंतर कोकाटे वांद्रे येथील लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. नाशिक पोलिसांची टीम ज्यामध्ये दहा हवालदार तीन अधिकारी अशा एकूण 13 जणांचे टीम कोकाटे यांना अटक करण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे.

माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याच्या प्रोसेस सुरू करणार

दहा मिनिटांपूर्वी नाशिक पोलिसांची टीम मुलुंड टोल नाका क्रॉस करून मुंबईमध्ये दाखल झाली आहे. अर्धा तासांमध्ये नाशिक पोलीस वांद्रे येथील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होतील. माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याच्या प्रोसेस सुरू करणार आहेत. 

तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोलिस पुढे कारवाईबाबत निर्णय घेणार

नाशिक पोलिसांकडून कारवाईपूर्वी कोकाटे यांचा सध्याचा वैद्यकिय अहवाल पाहून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोलिस पुढे कारवाई करण्याबाबत निर्णय घेतील. शिवाय कारवाईपूर्वी नाशिक पोलिस वांद्रे पोलिसांना याबाबत कळवू शकतात. मात्र, न्यायालयाचे आदेश असल्याने मुंबई पोलिसांना कळवणे तसे बंधनकारक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र कोकाटेंवर कारवाईपूर्वी वैद्यकिय अहवाल आणि तज्ञ डॉक्टरांच्या सल्यानुसार पुढील कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola