Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
कोकाटेंच्या सोबतीनं अजित पवारांच्या मागे जणू अडचणींचं शुक्लकाष्ठच लागलंय....गेल्या अनेक महिन्यांपासून अजित पवारांना सातत्यानं अडचणींचा सामना करावा लागतोय....मग ते अजित पवारांचं वैयक्तिक आयुष्य असो किंवा राजकीय कारकीर्द...अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत वाल्मिक कराडप्रकरणी धनंजय मुंडेंची विकेट पडली...त्यानंतर विधानसभेत रमीचा डाव मांडल्याप्रकरणी आणि सदनिका लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे अडचणीत आले...अखेर त्यांचाही राजीनामा घेण्याची वेळ अजितदादांवर आली...काही दिवसांपूर्वी दादांचे पुत्र पार्थ पवारांचं नाव पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात आलं...आणि आता साताऱ्यातल्या ड्रग्ज प्रकरणी राष्ट्रवादीचा पदाधिकारी विशाल मोरेभोवती क्राईम ब्रँचनं फास आवळलाय. मेफेड्रोन प्रकरणाचा सूत्रधार राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याची खळबळजनक माहिती माझाच्या हाती लागलीय...हा विशाल मोरे अजित पवारांच्या गटाचा विद्यार्थी सेलचा प्रमुख आहे..3 डिसेंबरलाच त्याची पुणे शहर विद्यार्थी आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली त्यानंतर ८ डिसेंबरला मुलुंड पोलिसांनी विशाल मोरेला अटक केली...