Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता...वॉरंट घेऊन नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना...कोकाटेंचा राजीनामा तत्वत: स्वीकारला, अजितदादांनी केलं जाहीर...
मंत्रिमंडळातील पुनरागमानासाठी प्रयत्नशील असणाऱ्या धनंजय मुंडेंना कडवा विरोध...मुंडेंना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळेंचा इशारा...
साताऱ्यातील सावरी ड्रग्जप्रकरणी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंभोवती अडचणींचा डोंगर, राष्ट्रवादीचा पदाधिकारी विशाल मोरेचं तात्काळ निलंबन, तर एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, ठाकरेंच्या सेनेची मागणी
शरद पवारांनी अजित पवारांचा हात धरणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप...पवारांची भेट घेत ठाकरे बंधूंसोबत येण्याचं राऊतांचं आवाहन... शरद पवारांच्या भूमिकेकडे नजरा
मुंबईत अजित पवारांना बाजूला ठेवत भाजप आणि शिंदेसेनेच्या १५० जागांचा फॉर्म्युला निश्चित, उरलेल्या ७७ जागांवर लवकरच तोडगा...नवाब मलिकांना भाजपचा विरोध कायम...
सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर नराधमांकडून बलात्कार, ऋतिक महापुरे आणि आशिष खांबेला २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
काँग्रेस खासदार प्रियंका गांधींनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट, चंदीगढ- शिमला हायवेसंदर्भात चर्चा...