Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Continues below advertisement

बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी माणिकराव कोकाटेंबाबतची...नाशिक सदनिका घोटाळ्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन सुरु झालंय...नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना झालेत...लीलावती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा ताबा पोलीस घेणार आहेत..त्यामुळे कोकाटेंना पुढच्या काही तासात अटक होण्याची शक्यता आहे...दरम्यान मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलाय. हा राजीनामा आता राज्यपालांकडे पाठवण्यात आलाय.,  १६ तारखेला कोर्टाच्या निर्णयानंतर १७ डिसेंबरलाच माणिकराव कोकाटेंनी आपला राजीनामा दिला होता.. कालच मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंकडील खात्यांचा कार्यभार, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवला होता..

माणिकराव कोकाटे कोणत्या प्रकरणामुळं अडचणीत? 

नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी कमी उत्पन्न दाखवत अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. या प्रकरणी फेब्रुवारी 2025 मध्ये माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. यावर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात अपिल केलं होतं. सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली. माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola