Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
सध्या कोकणात एका प्रकल्पाची जोरदार चर्चा आहे. हा प्रकल्प सुरु आहे रत्नागिरीच्या चिपळूणमधील लोटे एमआयडीसीमध्ये. पण लोटेत सुरु झालेला हा प्रकल्प इटलीतून हद्दपार झाला होता. दरम्यान भारतातील लक्ष्मी ऑरगॅनिक यांनी ही कंपनी विकत घेतली आणि विषारी केमिकलचं उत्पादन लोटेत सुरु झालं. मात्र या प्रकल्पाला मंजुरी कशी मिळाली? या विषाची परीक्षा कशासाठी? असा संतप्त सवाल कोकणकर विचारतायत... पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट
कोकणात चिपळूणजवळच्या लोटे परशूराम एमआयडीसीतला हा लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रिज लिमिटेड नावाचा कारखाना... खरंतर कोणत्याही एमआयडीसीत असतो त्याप्रमाणे दिसणारा हा कारखाना सध्या वेगळ्याच वादात अडकलाय. या वादाचं मूळ आहे युरोपातील इटली या देशात
इटलीत मितेनी नावाने असलेला कारखाना प्रदुषणाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हद्दपार करण्यात आला होता. इटलीत कारवाई झाल्यावर या मितेनी कंपनीचा कारखाना आणि तिथलं उत्पादन ठप्प झालं. इटलीत या कारखान्यामुळे झालेल्या प्रदुषणामुळे जवळपास साडेतीन लाख लोक बाधित झाले होते... आता ती बंद झालेली कंपनी भारतातल्या लक्ष्मी ऑरगॅनिक यांनी विकत घेतलीय. त्यानंतर लोटे एमआयडीसीत कारखाना सुरू करण्यात आला आहे.
लक्ष्मी ऑरगॅनिकने वादग्रस्त मितेनीची मशिनरी, पेटंट, तंत्रज्ञान २०१९ मध्ये खरेदी केलं. लोटे परशुराम एमआयडीसीत पीएफएएस म्हणजे पर आणि पॉलिफ्लुरोअल्कील या घातक रसायनाचं उत्पादन केलं जातंय. या उत्पादनामुळे पर्यावरण आणि आरोग्याचा धोका वाढलाय पीएफएएस हे रसायन कीटकनाशकं, औषधं, सौंदर्य प्रसाधनात वापरलं जातं इटलीत मितेनी कंपनीने पीएफएएस ही घातक रसायनं भूगर्भातील पाण्यात आणि एका मोठ्या जलसाठ्यात सोडली यामुळे साडेतीन लाखांहून अधिक लोकांना कर्करोग, यकृताचे आजार झाले जून २०२५ मध्ये मितेनीच्या ११ माजी अधिकाऱ्यांना तब्बल १४१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रदूषणाची, घातक परिणामांची माहिती असूनही माहिती लपवल्याचं उघड झालं होतं