Lakhimpur Kheri Violence : राहुल गांधी... दिल्ली ते लखीमपूर व्हाया लखनौ Special Report
Lakhimpur Kheri Violence: वाढत्या दबावापुढे यूपी सरकारने एक पाऊल मागे घेत राजकीय नेत्यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला भेट देण्याची परवानगी देण्यात आली आहे. राहुल गांधींनी लखनौला जाण्यासाठी काही वेळापूर्वी दिल्ली विमानतळ सोडले आहे. पंजाब आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही राहुल यांच्यासोबत जात आहेत. काँग्रेसचे तीन्ही नेते लखीमपूर खेरीच्या पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील.
उत्तर प्रदेश सरकारच्या गृह विभागाने सांगितले की, राज्य सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर तीन जणांना लखीमपूर खेरीला भेट देण्याची परवानगी दिली आहे.
All Shows































