Konkan Railway : रेल्वे आरक्षणात काळाबाजर, माझाची बातमी, चौकशीचे आदेश Special Report
गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेची तिकिटं काढणारी तब्बल १६४ आरक्षण खाती बनावट असल्याचं मध्य रेल्वेच्या चौकशीत उघड झालंय. त्यामुळं मध्य रेल्वे संबंधितांवर कारवाई करणार आहे. यंदा गणेशोत्सव १९ सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. त्यामुळं नियमानुसार १२० दिवस आधी म्हणजेच १८ मे रोजी कोकण रेल्वेचं आरक्षण सुरू झालं. पण बुकिंग सुरु व्हायची खोटी की, कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजाराच्या पार गेली. कोकण रेल्वे मार्गावरच्या अन्य ट्रेन्सचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. त्यामुळं कोकणवासीय गणेशभक्तांचा संताप अनावर झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर झालेल्या चौकशी सारा घोटाळा स्पष्ट झालाय पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
All Shows

































