Honey Trap : कोल्हापूरचा उद्योजक 'हनी ट्रॅप'चा बळी; मैत्रिण खोटी, गमावले तब्बल सव्वातीन कोटी रुपये
abp majha web team
Updated at:
20 Nov 2021 10:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर : उद्योजकाला मैत्रिचा थोडा-थोडका नाही तर तीन कोटींचा फटका बसला आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या या उद्योजकाकडून त्याच्या मैत्रिणीने आणि तिच्या टोळक्याने तब्बल तीन कोटी 30 लाख रुपये उकळले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात पीडित म्हणून भूमिका बजावणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून अद्याप शोध सुरू आहे.