Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
पुणे : जेजुरी नगरपरिषद निकालाच्या उत्साहाला गालबोट लागल्याची घटना घडली. विजयाचा भंडारा उधळल्यानंतर आगीचा मोठा भडका (Jejuri Fire) उडाल्याचं दिसून आलं. या घटनेत 16 जण भाजले असून काही नगरसेवकांचाही त्यामध्ये समावेश आहे. जेजुरी गडाच्या पायथ्याशी फटाके फुटत असताना भंडारा उधळल्यानंतर आगीचा भडका उडाला. भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचा निकाल आज जाहीर झाला. जेजुरी नगरपरिषदेवर सत्तांतर होऊन अजितदादांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली. त्यानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला.
Jejuri Nagar Parishad Election Result : भंडाऱ्याची उधळण आणि आगीचा भडका
जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना फटाके वाजत होते. सोबतच भंडाऱ्याची उधळणही होत होती होते. त्यामुळे भंडारा उधळल्यानंतर आगीचा भडका उडाला आणि त्यामध्ये 169 जण भाजले गेले. जमखींमध्ये नुकतेच निवडून आलेल्या काही नगरसेवकांचा समावेश आहे.
ही घटना रविवारी दुपारी घडली असून त्यामध्ये भाजले गेलेल्यांना जवळच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न जेजुरीमध्ये ऐरणीवर आला आहे.