Jaish e Mohammed | कुटुंब ठार पण मसूद कसा वाचला? 'जैश'चा संस्थापक Masood Azhar भारताचं पुढचं टार्गेट
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. आणि यात सर्वात मोठा तडाखा दिला तो जैश ए मोहम्मदला. जैश ए मोहम्मदच्या बहावलपूर आणि सियालकोटमधले महत्वाचे तळ बेचिराख झाले. त्यात कुख्यात दहशतवादी आणि कंदाहार विमान अपहरणामागचा मास्टरमाईंड रौफ असगरही ठार झाला. पण या हल्ल्यात कुख्यात दहशतवादी मसूद अजहर मात्र वाचलाय. आता भारताचं लक्ष्य आहे ते मसूद अजहरला संपवणं..... पाहूयात हा खास रिपोर्ट...
छोट्या उंचीचा मोठा राक्षस... नाव मसूद अजहर... जैश ए मोहम्मदचा संस्थापक
२४ डिसेंबर १९९९... काठमांडू दिल्ली आयसी - 814 विमानाचं अपहरण करून ते कंदाहारला नेण्यात आलं. विमानातील १७६ प्रवासी आणि १५ क्रू मेंबर्सच्या बदल्यात भारताला मसूद अजहर, उमर शेख आणि अहमद झरगर या दहशतवाद्यांना सोडावं लागलं.
भारताच्या तावडीतून सुटलेल्या मसूद अजहरने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. याच जैश ए मोहम्मद संघटनेनं देशात सर्वाधिक दहशतवादी कारवाया केल्या. त्यात ६ मोठ्या हल्ल्यांचा समावेश आहे.
२००१ मध्ये संसद भवन परिसरात दहशतवादी घुसले, बेछूट गोळीबारात अनेकांचा बळी घेतला... या हल्ल्याचा सूत्रधार होता मसूद अजहर...
All Shows

































