Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
शेतकरी आधीच कर्जात बुडालेला... निसर्गाच्या लहरीपणानं हैराण झालेला... आणि आता त्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याचं नवं संकट... राज्यात अनेक भागात डिझेल मिळत नसल्यानं ट्रॅक्टर बंद पडलेत... ज्याच्याकडे डिझेल इंजिननं पाणीउपसा होतो त्यांना आता पिकांना पाणी देता येत नाहीये... तर शेतमाल बाजारात नेण्यासाठीही शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे... सरकारच्या नियोजनाच्या अभावाचा सर्वात मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजालाच बसतोय... पाहूयात हा ग्राऊंड रिपोर्ट...
पेट्रोल पंपावर पहाटेपासून लागलेल्या रांगा...
डिझेलसाठी हातात कॅन घेऊन उभे असलेले शेतकरी...
आणि “डिझेल संपलं” असं म्हणणारे कर्मचारी...
हे दृश्य राज्यभरातल्या अनेक पेट्रोलपंपांवर दिसतंय...
आजची शेती आधुनिक झालीये...
त्यामुळे ती पूर्वीसारखी जैविक उर्जेवर नाही...
तर यांत्रिक उर्जेच्या मदतीनं केली जाते...
त्यामुळे शेतीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर, पंप, अनेक यंत्रं आणि इतर गाड्या
सगळं काही डिझेलवर चालतं...
मात्र डिझेलच उपलब्ध नसल्यानं शेती करायची कशी?
असा सवाल सध्या शेतकऱ्यांसमोर आहे...
हे आहेत छत्रपती संभाजीनगरच्या
वैजापूर तालुक्यातल्या फुलेवाडीचे शेतकरी
बाळू गोपीनाथ गायकवाड...
गायकवाडांची सात एकर शेती आहे...
मात्र डिझेल अभावी त्यांचे ट्रॅक्टर आज शेतात धूळखात उभे आहेत....
All Shows
































