MLC Election | भाजपला हरवण्याचा फॉर्म्युला सापडला?पुणे-नागपूरचे भाजपचे गड कोसळले कसे? स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Dec 2020 10:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांच्या निकालात महाविकास आघाडीने सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे. नागपूर पदवीधर विधानपरीषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत.