Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha
मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपा आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक, 
एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्यानं कुठलाही फरक पडत नाही. धस-मुंडे भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. धसांच्या कामगिरीमुळे अनेकांची पोटं दुखतायत. फडणवीसांचा टोला.  
संतोष देशमुख प्रकरण निकाली लागेपर्यंत मुंडे आणि धस आपली भूमिका कायम ठेवणार, धसांना पूर्ण काम करण्याची मुभा, बावनकुळेंचं वक्तव्य.
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या आईंसंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी. धनंजय मुंडेंच्या चुलत भावानं केली तक्रार दाखल. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता, अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळलं जाणार, उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार.
महाराष्ट्रातील महिलांचा सरकारकडून अपमान, आधी शब्द दिला आणि आता तो फिरवला, लाडकी बहीण योजनेवरुन खासदार सुप्रिया सुळेंची टीका. 
लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेली लालूच, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola