
Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha
Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha
कृष्णा आंधळेला अद्याप अटक नाही या पार्श्वभूमीवर मस्साजोगमध्ये आज बैठक.बैठकीला धनंजय देशमुखही उपस्थित राहणार.बैठकीनंतर पुढची दिशा ठरवणार.
राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं, सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक विधान
मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपा आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक,धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची मागितली माहिती, कृषी विभागाला पत्र पाठवून सुरेश धसांची मागणी.
एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्यानं कुठलाही फरक पडत नाही. धस-मुंडे भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. धसांच्या कामगिरीमुळे अनेकांची पोटं दुखतायत. फडणवीसांचा टोला.
संतोष देशमुख प्रकरण निकाली लागेपर्यंत मुंडे आणि धस आपली भूमिका कायम ठेवणार, धसांना पूर्ण काम करण्याची मुभा, बावनकुळेंचं वक्तव्य.
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या आईंसंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी. धनंजय मुंडेंच्या चुलत भावानं केली तक्रार दाखल. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल