Heramb Kulkarni Special Report : हेरंब कुलकर्णी यांच्यावर Ahmednagar मध्ये हल्ला, कारण काय?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगर : साहित्यिक तसेच सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शनिवारी अहमदनगर शहरातील रासने नगर या भागात हेरंब कुलकर्णी यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
हेरंब कुलकर्णी ज्या महाविद्यालयात मुख्यधापक आहे त्या महाविद्यालयाभोवती अक्षय सब्बन या आरोपीची अतिक्रमण करून टाकण्यात आलेल्या पान टपरीबाबत कुलकर्णी यांनी महानगरपालिकेत अर्ज केला होता. त्यानुसार महापालिकेने कारवाई देखील केली होती. महापालिकेने कारवाई केल्याने त्याचा राग मनात धरून अक्षय सब्बन याने त्याच्या पाच साथीदारासह कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला होता.