Vulture Journey : ताडोबातलं गिधाड कसं पोहोचलं तामिळनाडूत? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ताडोबातून निघालेलं एक पांढऱ्या पाठीचं गिधाड
जवळपास ४००० किमीचं अंतर पार करत...
((मॅप रुट...))
पोहोचलं तामिळनाडूच्या कलसपक्कममध्ये...
यादरम्यानं या गिधाडानं तब्बल पाच राज्यातून प्रवास केलाय...
((पीटीसी - निसर्गचक्रात सध्या गिधाड हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी बॉम्बे नॅचर हिस्ट्री सोसायटी गिधाडांच्या संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवतंय. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हरियाणायात एक गिधाड प्रजनन केंद्र उभारण्यात आलंय. तिथूनच काही गिधाडं गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ताडोबात आणण्यात आली होती.))
हरियाणातून ताडोबात आणलेल्या या गिधाडांमध्ये
१० पांढऱ्या पाठीची गिधाडं होती
ऑगस्ट महिन्यात या गिधाडांना जीपीएस टॅग लावण्याच आला
आणि त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं....
त्यापैकी एन इलेव्हन नावाच्या एका मादी गिधाडानं विक्रमी प्रवास केला....
ताडोबातून आधी २०० किमीचा प्रवास करत छत्तीसगड
मग तिथून ६०० किमी प्रवास करत गुजरात
तिथून पुन्हा महाराष्ट्र
मग महाराष्ट्रातून कर्नाटक
आणि कर्नाटकच्या वेगवेगळ्या भागातून प्रवास करत
हे गिधाड तामिळनाडूत पोहोचलं....
हे संपूर्ण अंतर होतं जवळपास ४ हजार किमी.
((गिधाडाच्या प्रवासाविषयी थोडक्यात...))
९० च्या दशकात भारतात सर्वत्र गिधाडांचा वावर होता...
निसर्गातले सफाई कामगार म्हणून गिधाडं ओळखली जातात
पण गेल्या काही दशकात गिधाडांचं अस्तित्वच धोक्यात आलंय
मेलेले प्राणी, गुरं ढोरं हे गिधाडांचं खाद्य
पण याच प्राण्यांच्या उपचारासाठी वापरलं जाणारं डायक्लोफेनाक नावाचं औषध
गिधाडांसाठी मात्र जीवघेणं ठरलं
मात्र ताडोबातल्या एन इलेव्हन गिधाडाचा हा प्रवास
गिधाड संवर्धन प्रकल्पातील महत्वाचा टप्पा ठरेल, हे नक्की...
चंद्रपूरहून सारंग पांडेसह सिद्धेश कानसे, एबीपी माझा मुंबई