✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case| बीडचा बिहार नाही, हमास केला, धस यांचा हल्लाबोल Special Report

सलमान शेख   |  05 Jan 2025 10:52 PM (IST)

सुरेश धस यांचा हाच आक्रोश पुण्यातल्या जनआक्रोश मोर्चात सर्वाधिक लक्षवेधी ठरला. 
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुण्यात निघालेल्या या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी आणि देशमुख कुटुंबीयांनी हजेरी लावली.
धनंजय मुंडे गो बॅक, परळी म्हणजेच बिहार असे थेट हल्लाबोल करणारे बोर्ड हातात घेऊन मोर्चेकऱ्यांनी पुण्यात चांगलीच गर्दी केली.
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांची वाणी या गर्दीसमोर अधिकच तिखट झाली.
भाषणाच्या सुरुवात त्यांनी पुणेकरांनाच पुण्याच्या इतिहासाची आठवण करून दिली. 



((शाहिस्तेखानाची बोटं महाराजांनी इथं कापली. रामशास्त्री प्रभुणेंनी याच पुण्यात पवित्र न्यायदानाचं काम केलं. तो बाा मनात ठेवून भविष्यात हे चिलेपिले लेकरंबाळं यांचं छत्र हरपून घेणार आका असो किंवा मोठा आका असो, यांना फाशीच झाली पाहिजे.))



संतोष देशमुख हत्याप्रकरणातले आरोपी पुण्यात सापडले असल्याच्या मुद्द्याला स्पर्श करत वाल्मिक कराडच्या काळ्या धंद्यांचे पुरावे कुठे सापडतील, हेही सांगितलं. 



((गँग्स ऑफ परळीमुळं पुण्याचं नाव खराब होईल. आमचे वाल्मिकअण्णा उर्फ आका किती मोबाईल वापरतात. सतरा मोबाईल नंबर वापरतात. नितीन कुलकर्णी हा आणि आका दोघे मिळून.. नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झाला आहे. त्याला आणा आणि सगळे पुरावे या १७ मोबाईलमध्ये सापडतील.))



त्यानंतर धस यांनी आजच्या दिवसातला सर्वात मोठा आरोप केला. 
संतोष देशमुख हत्येचा कट कसा शिजला, कुठे शिजला, कितीचं डील झालं, या सगळ्याचा ‘कच्चा चिठ्ठा’च त्यांनी व्यासपीठावरून मांडला.



((१४ जूनला वाल्मिक कराड, नितीन बिक्कड अनंत काळकुटे, आवादा कंपनीचे शुक्ला यांची परळीला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली. बैठकीत डील ३ कोटीला फायनल झाली. आका क्या बोले.. थ्री करोड लाके दो.. इलेक्शनच्या काळात यांनी ५० लाख रुपये ऑलरेडी यांच्या हातात दिले आहेत. ते कुणी घेतले माहित नाही.))



केवळ आरोप करून ते थांबले नाहीत, तर आरोप चुकीचे निघाले तर त्याचं काय प्रायश्चित्त आपण घेणार, हेही सांगून टाकलं. 



((ही बैठक झाल्याचं खोटं निघालं तर राजकारण सोडीन.. आत्ता ३०० गायींचा गोठा आहे. १००० गायींचा गोठा करीन. दोन तीनशे म्हसाडंही आणीन. म्हसाडं धुत बशीन. राजकारणात राहणार नाही.))



सत्ताधारी सुरेश धसांप्रमाणंच विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही बीडच्या दादागिरीचं वास्तव मांडत धनंजय मुंडेवर कारवाई करण्याची मागणी केली.




((बीड जिल्ह्यातील दादागिरीनं जिणं मुश्किल केलंय. ही दादागिरी फक्त निवडणुकीपुरती राहिली नाही. घरातल्या मुलीबाळी, समाजबांधवांना बाहेर निघणं मुश्किल करून टाकलंय या दादागिरीनं.))



((कुणाचीही गय केली नाही पाहिजे. आरोपी कितीही मोठ्या व्यक्तीच्या जवळचा असला तरी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे, हे दाखवून दिलं पाहिजे. हे आज महाराष्ट्रात दिसत नाही.))



संतोष देशमुखांच्या लेकीनंही उपस्थित पुणेकरांना भावनिक साद घालत आपल्या पाठीवर वडिलांप्रमाणे हात ठेवण्याची साद घातली.



((माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय, न्याय मिळवण्यासाठी तुम्ही एकत्र आहात. वडिलांचा हात जसा मुलीच्या पाठीवर राहतो, तसा तुमचा हात माझ्या पाठिवर राहुद्या. ))



गुन्ह्याचा तपास आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा अशा दोन पातळ्यांवर सध्या संघर्ष सुरु आहे.
पुण्यातल्या या मोर्चात आका या शब्दाचा वापर कमी होऊन थेट वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे असा थेट उल्लेख होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसलं.
धनंजय मुंडेंविरोधात सर्वपक्षीय नेते अधिक आक्रमक झाल्याची झलक पुण्याच्या मोर्चात दिसून आली.
मोर्चेकऱ्यांचा हा आक्रोश धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत पुनर्विचार करण्यासाठी सरकारला भाग पाडणार का, हे लवकरच कळेल.


ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Suresh Dhas On Santosh Deshmukh Case| बीडचा बिहार नाही, हमास केला, धस यांचा हल्लाबोल Special Report

TRENDING VIDEOS

Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा6 Minutes ago

Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?58 Minutes ago

Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत1 Hour ago

Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?6 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.