Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जा

Continues below advertisement

गेल्या दोन मालिकेत ही ट्रॉफी भारताकडे राहिली

पण कांगारुंनी दहा वर्षांनी या ट्रॉफीवर पुन्हा कब्जा केलाय

तोही पाच कसोटी सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकानं जिंकून


पर्थची पहिली कसोटी जिंकून भारतानं ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली...

पण त्यानंतर अॅडलेड,

मेलबर्न

आणि सिडनीत भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला...

आणि भारतानं मालिकाही गमावली...


या पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक

गौतम गंभीर यांनी काय प्रतिक्रिया दिली, पाहूयात...


कांगारुंकडून झालेल्या या पराभवाला

भारताचा फलंदाजीतला फ्लॉप शो कारणीभूत ठरला...

यात रडारवर आले ते रोहित शर्मा आणि विराट कोहली हे अनुभवी फलंदाज

२०१८ साली भारताला ऑस्ट्रेलियात

पहिल्यांदा कसोटी मालिकाविजय मिळवून देणारा विराट कोहली

यावेळी मात्र अपयशी ठरला...


५ कसोटीत विराटनं केल्या फक्त --- धावा. त्याची सरासरी होती ....


तर रोहित शर्मालाही फारसा प्रभाव पाडता आला नाही....

मालिकेत पाचपैकी तीन कसोटी रोहित खेळला

त्यात त्याला फक्त ३१ धावाच करता आल्या...


खराब फॉर्ममुळे रोहित स्वत: शेवटच्या कसोटीतून बाहेर राहिला...

पण यामुळे सामन्याचा रिझल्ट मात्र बदलला नाही...


बॉर्डर-गावस्कर मालिका भारतानं गमावली

पण या मालिकेचा हीरो ठरला तो जसप्रीत बुमरा

एकट्या बुमरानं संपूर्ण मालिकेत ३२ विकेट्स घेत

ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रुममध्ये दहशत निर्माण केली होती...

पण दुसऱ्या बाजूनं योग्य ती साथ न मिळाल्यानं कांगारु वरचढ ठरले....


या मालिकेसह भारतानं जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या फायनलमधलं स्थानही गमावलंय...

नव्या वर्षात भारत इंग्लंडचा खडतर दौरा करणार आहे

त्या दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या चुका टाळून नव्यानं संघबांधणी करण्याची संधी आहे

त्यासाठी वेळही पुरेसा आहे....

त्यामुळे बीसीसीआयची निवड समिती

आता नव्यानं काय प्लॅनिंग आखतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल...

सिद्धेश कानसेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram