रोजगार हमी योजनेची बोगस यादी तयार करून पैसे लुटले, भ्रष्टाचाराची पोलखोल करणारा औरंगाबादचा रिपोर्ट
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
22 May 2021 11:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद : कोविड रुग्ण रोजगार हमीवर काम करु शकेल का? विश्वास बसत नाही ना. पण औरंगाबादमध्ये रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात त्यांच्या गावात कोरोनाची लागण झाली असलेल्या काही लोकांनी रोजगार हमीवर काम केलं आणि विशेष म्हणजे त्याचे पैसे देखील त्यांना मिळाले आहेत. औरंगाबाद-बीड बायपास हायवे ते साजेगाव रोड. या रस्त्याचं काम रोजगार हमी योजनेतून केले आहे. हा रस्ता कामगारांनी बनवला असं सांगितले जात आहे. रस्ता असा की एखाद्या जेसीबी किंवा पोकलेनने केल्यासारखा. कामगारांनी बनवला आहे यावर विश्वास बसत नाही. असो पण खरी गंमत पुढे आहे. या रस्त्याच्या कामावर अशा कामगारांनी काम केलंय जे कोविड पॉझिटिव्ह आहेत. हे आम्ही नाही तर सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणत आहे.