Anand Dighe Special Report : आनंद दिघेंच्या प्रॉपर्टीवर कुणाचा डोळा? शिंदे - विचारे भिडले!
"गद्दारांना गाडलंच पाहिजे. गद्दारांना गाडा ही फक्त घोषणा असता कामा नये. ही शिवसेना ठाण्याची शिवसेना आहे. आनंद दिघेंचं वाक्य होतं की, गद्दारांना क्षमा नाही. चित्रपटाच्या निमित्ताने समोर आलं ते त्यांना स्वत:ला समजायला पाहिजे. ते आता ठाणेकर करुन दाखवणार आहेत. गद्दारांना क्षमा नाही. राजन विचारे निष्ठावंत शिवसैनिक आहे, राजन विचारेंनी स्टॅडिंग कमिटी सोडली नसती तर हे भूत जन्मालाच आले नसते. आनंद दिघेंचा मृत्यू झाला पण त्यांनी भगवा सोडला नाही. याला निष्ठा म्हणतात. गद्दारांना निष्ठा काय असते हे शिकवण्याची नाही तर दाखवण्याची वेळ आली आहे. मला खात्री आहे की, राजनचा विजय तर होणार आहेच. पण राजन विचारेंचा विजय गद्दारांचे डिपॉझिट करुन पाहिजे. फक्त गोंधळून जाऊ नका. धनुष्यबाण चोरांच्या हातात आहे", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह मोदी-शाहांवर जोरदार हल्लाबोल केला.