Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ

Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ 

पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
पवई फुलेनगर परिसरातून  युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. पावसामुळे वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे. 


पावसाचे सविस्तर अपडेट्स - 

Maharashtra Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने राज्यभरात 12 जणांचा मृत्यू झालाय . यात नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली .  कोकण, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी झाली असून पिकं पाण्याखाली गेली आहेत . आठवड्याच्या सुरुवातीलाच झालेल्या बेफाम पावसाने नोकरदारांची दैना झाल्याचं दिसून आलं .  मराठवाड्यात पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसाने अनेक गाव जलमय झाली असून  ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेकडो जनावरांचा मृत्यू झालाय .अनेकांची घर पाण्याखाली गेली आहेत . नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे .

नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली होती. ढगफुटी सदृश्य परिस्थितीत तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला. मात्र सध्या नांदेडमधील पाऊस ओसरला असून परिस्थिती सामान्य होत आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, जेवणखाण्याची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास लष्कराची मदत घेतली असल्याचंही मंत्री महाजन यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola