Dhananjay Munde:सहआरोपी करा,राजीनामा द्या; जरांगेंचा मुंडेंवर हल्लाबोल Rajkiya Sholay Special Report
बेल्स पालसी आजाराचं निदान झाल्यामुळं धनंजय मुंडे सध्या विश्रांती घेतायत...पण त्यांचे विरोधक मात्र स्वस्थ बसलेले नाहीत...धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होतेय...सुरेश धस यांनी पहिल्यांदाच मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीला हात घातला. त्यानंतर आता अधिक आक्रमक होत जरांगेंनी एक पाऊल पुढे टाकलंय...दुसरीकडे मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्या अंजली दमानियांवरच खोक्याचा आरोप झालाय...पाहुया याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट, आजच्या राजकीय शोलेमध्ये...
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून एकमेकाच्या कोर्टात टोलवला जात असतानाच पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे या प्रकरणात आक्रमक झालेत.
दिवंगत संतोष देशमुखांना न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या मस्साजोग ग्रामस्थांची आणि देशमुख कुटुंबीयांची जरांगेंनी भेट घेतली.
आतापर्यंत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या जरांगेंनी एक पाऊल पुढे टाकत त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केलीय.
तीदेखील धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख करत..
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्यांची यादी वाढत चाललीय...त्यात
संदीप क्षीरसागर, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार)
अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या
करुणा मुंडे,
मनोज जरांगे, मराठा आंदोलक
बजरंग सोनवणे, खासदार, राष्ट्रवादी (शरद पवार)
संजय राऊत, खासदार, शिवसेना (ठाकरे)
प्रकाश सोळंके, आमदार, राष्ट्रवादी
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
यांचा समावेश आहे..