Prafulla Patel Special Report : एकाच व्यासपीठावर आलेल्या पटेल, फडणवीसांची भाषणातून सूचक वक्तव्य
abp majha web team | 09 Feb 2023 09:39 PM (IST)
Prafulla Patel Special Report : एकाच व्यासपीठावर आलेल्या पटेल, फडणवीसांची भाषणातून सूचक वक्तव्य
गोंदिया जिल्हा परिषदेत एकत्रित सत्तेत असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस... तर भंडारा जिल्हा परिषदेत एकत्रित विरोधी बाकांवर बसलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस... सध्या या दोन्ही पक्षात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्या संदर्भात काहीतरी वेगळं शिजतंय का??? आणि असा प्रश्न विचारण्याचा कारण म्हणजे दोन्ही पक्षातील दोन सर्वोच्च नेत्यांनी आज गोंदियात एका शैक्षणिक कार्यक्रमात फक्त मंचच शेयर केला नाही... तर भविष्याच्या राजकारणाच्या अनुषंगाने अनेक सूचक वक्तव्य ही केले. गोंदियामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांच्यादरम्यान खास राजकीय केमिस्ट्री दिसून आली.