'सध्या लूज बॉल मिळताहेत, त्यांना सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते'; फडणवीसांची मैदानातून फटकेबाजी
सध्याच्या परिस्थितीत मला लूज बॉल मिळत आहेत. त्यांना मला सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेटच्या मैदानातून फटकेबाजी केली आहे. वडाळा विधानसभा मतदार संघात आज भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या तर्फे आमदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं होतं. या आमदार चषकाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी फलंदाजी करत काही फटके देखील लगावले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मला हल्ली सर्व लूज बॉल येत आहेत, बॅटिंग करायला मजा येतेय, मी बॉडिलाईन गोलंदाजी करत नाही, योग्य पद्धतीनं खेळतो.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला बॅटिंग करायला मजा येते. लहानपणी मी बॅटिंग-बॉलिंग दोन्ही करायचो. फिल्डिंग कमी करायचो पण ज्यावेळी करायचो त्यावेळी कॅच सुटायचे नाहीत. माझे ठरले आहे की, मी पेस बॉलिंग करणार मी गुगली पण टाकणार आहे. आणि जेंव्हा बॅटिंग का येईल ती ही चांगली करेन. मी योग्य बॉल टाकतो. मी शॉटपिच बॉलिंग करतो. त्याने समोरच्यांना खेळायला अडचण होत आहे.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या





























