Devendra Fadnavis : कितीही दबाव टाका, गप्प बसणार नाही, चौकशीनंतर फडणवीसांचा हल्लाबोल Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची रविवारी मुंबई पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी झाली. या चौकशीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. राजकीय अभिनिवेशातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. दबावात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही सगळे पुरावे सीबीआयला देऊ, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
जे आज प्रश्न आज विचारले ते आधीच्या प्रश्नापेक्षा वेगळे होते. ज्यामध्ये मी ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट चा उल्लंघन केले असा आरोप लावण्यात यावा अश्याप्रकारे प्रश्न विचारले गेले. नोटीस देऊन मला दबावात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. गृहमंत्री काहीही म्हटले तरी माझे प्रोव्हेलेज काय आहेत ते मला माहित आहे. सीबीआय या संदर्भात कारवाई करत आहे, जवाब नोंदविले जात आहेत. माझ्यावरील कारवाई राजकीय अभिनेवेशातूनच केली जात आहे. वेळेत तुम्ही जर याची चौकशी केली असती तर हे करावं लागलं नसते. आमचे कांड कोणी काढू नये, यासाठी दबाव आणला जातोय. ज्याचा लोकशाही वर विश्वास आहे त्यांना ही नोटीस चुकीची वाटेल. आम्ही सगळे पुरावे सीबीआयला देऊ त्याचा तपास सीबीआय करेल, असे फडणवीस म्हणाले. संजय राऊत घाबरून पत्रकार परिषद घेतायेत, केंद्रीय तपास यंत्रणावर आरोप करतात. मला नोटीस आल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. संजय राऊतवर जर अशी वेळ आली तर मला का बोलवलं , असा म्हणत का घाबरतात? असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.