Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

Continues below advertisement

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पक्ष आपल्या प्रचार सभा, दौरे, रॅली, जाहीरनामे प्रकाशित करत आहेत, अनेक पक्षांनी आपले जाहीरनामे प्रसिध्द केले आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाचा राजीनामा जाहीर प्रकाशित केला आहे. यावेळी त्यांनी 'आम्ही हे करू' या यावाने आपला जाहीरनामा प्रकाशीत केला आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष्य देण्यात आलं आहे. 

जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू इतकाच दिला आहे. पण, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू या देखील गोष्टी आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेले आहेत.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 19 वर्ष झाले आहे. या 19 वर्षांत मनसे काय, काय केले? त्याची माहिती दिली आहे. 

मी 2006 रोजी राज्याची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईल सांगितलं होते. ती 2014ला आली. पण या काळात मला हिणवलं गेलं. कुत्सितपणे प्रश्न विचारलं गेलं. 2014ला ती प्रसिद्ध झाली. त्यावेळी युती तुटली होती. पण गेल्या दहा वर्षात ब्ल्यू प्रिंटमध्ये काय आहे, कशी केली वगैरे कुणी मला विचारलं नाही. आमच्या जाहीरनाम्यामध्ये ब्ल्यू प्रिंटच्या अनेक गोष्टी आणलेल्या आहेत याचं कारण विषय बदलले नाहीत प्रश्न बदललेले नाहीत अद्यापही तेच प्रश्न आहेत अद्यापही आपण त्याच प्रश्नांवर चर्चा करत आहोत म्हणून मला असं वाटतं की आज हा जाहीरनामा तुमच्यासमोर ठेवत आहे. 

आज आमच्या पक्षाच्या अनेक उमेदवारांना किंवा नेत्यांना मी इथे बोललो नाही कारण ते आपापल्या मतदारसंघांमध्ये प्रचार करत आहेत त्यामुळे मी त्यांना त्रास दिला नाही इथे बोललेला नाही असे पुढे राज ठाकरे म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram