Raju Shetti : राजू शेट्टींचा 'करेक्ट कार्यक्रम' कोणी केला? सत्ताधाऱ्यांवरची टीका राजू शेट्टींना भोवली?
विजय केसरकर, एबीपी माझा | 03 Sep 2021 11:18 PM (IST)
Raju Shetti : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी राष्ट्रवादीच्या कोट्यातून संधी मिळालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पत्ता कापला गेल्याची चर्चा मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्या जागी कोणाला संधी मिळणार याबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. राजू शेट्टी यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा असताना आता दुसरीकडे त्यांच्या जागी माजी आमदार हेमंत टकले यांना संधी देण्यात आल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलीय