Congress Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला सुरुवात Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला आज सुरुवात झाली. यात्रा सुरु करण्यापूर्वी राहुल गांधींनी तामिळनाडूमध्ये श्रीपेरुंबदुर मधल्या राजीव गांधींच्या स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केलं. द्वेषाच्या राजकारणामुळे आपण आपल्या वडिलांना गमावलं आहे, पण आपला देश गमावणार नाही असं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी यात्रा सुरु कऱण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे तिरंगा सोपवला. ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर असं ३५०० किमी अंतर पार करणार आहे. देशातील आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी यात्रा असेल असं काँग्रेसनं म्हटलंय. देशाला एकत्र करणं हा यात्रेचा मुख्य उद्देश असून, बेरोजगारी, महागाई अशा मुद्द्यांवर लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय.