ABP News

ABP Majha Headlines : 8 AM TOP Headlines : सकाळी ८ च्या हेडलाईन्स : 02 February 2024 : ABP Majha

Continues below advertisement

दिवंगत सरपंचांचे भाऊ धनंजय देशमुख आज भगवान गडावर जाणार, महंत नामदेव शास्त्री यांची घेणार भेट.. पुराव्यांची फाईल सादर करणार... 
नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंना दिलेल्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया देणं पंकजा मुंडेंनी टाळलं...तर गडावरच्या माणसांनी शेवटच्या माणसाचंही ऐकलं पाहिजे, आव्हाडांचा सल्ला. 
मस्साजोग सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रशासन सतर्क, १२८१ शस्त्र परवाने असलेल्या बीड जिल्ह्यात १८३ शस्त्र परवाने रद्द, छाननीनंतर आणखी १२७  परवाने रद्द होणार 
आता जोडायची वेळ आहे...एबीपी माझाच्या मुलाखतीत मंत्री संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य..तर संधी मिळाल्यास ठाकरे आणि शिंदेंना एकत्र आणण्यासाठी करणार प्रयत्न.. तर गद्दारांसोबत जाणार नाही, अरविंद सावंतांची टीका  
मालेगावात जन्मदाखले घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल, बनावट कागदपत्रे देणाऱ्या तिघांना अटक, मालेगावात चार हजार बांगलादेशींनी जन्मदाखले मिळवल्याचा सोमय्यांचा आरोप 
बजेटमध्ये मोदी सरकारचं नोकरदारांसाठी मोठं गिफ्ट...१२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त...पुढच्या आठवड्यात नवं इन्कम टॅक्स विधेयक मांडणार... 
रेल्वेसाठी बजेटमध्ये दोन लाख ५२ हजार कोटींची तरतूद...यावर्षात प्रवाशांच्या भेटीला २०० वंदे भारत, १०० अमृत भारत आणि ५० नमो भारत ट्रेन येणार...संपूर्ण विद्युतीकरणाचं लक्ष्य...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram