राज्यपालांची यादी गुलदस्त्यात? वाढदिवसाचं औचित्य साधत भेट, दुरावा दूर होणार? स्पेशल रिपोर्ट
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज थेट राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून महाराष्ट्रात हा त्यांचा दुसरा वाढदिवस साजरा होतोय. गेल्यावर्षी वाढदिवसाच्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुंबई मध्येच होते मात्र त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना ट्विटर वरूनच शुभेच्छा देणं पसंत केलं. उद्धव ठाकरे गेल्यावर्षी राज्यपालांच्या भेटीला गेले नव्हते. यंदा मात्र वेगळे चित्र बघायला मिळालं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष राजभवनावर जाऊन राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेला राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष कमी होतो का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























