CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
नाविन्यपूर्ण घोषणा देत आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका करत आज शिवाजी पार्कवर कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा पार पडला. या मोर्चाला तरुणांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी व्यासपीठावर हजेरी लावली. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे जेलभरो आंदोलन करण्याचा नारा दिपकेंनी दिला होता. मात्र प्रत्यक्षात हा मोर्चा एका सभेच्या रुपातच संपन्न झाला. दुसरीकडं या मोर्चाला विरोध करत जेन नेक्स्ट असं नाव धारण करत रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईनंही लक्ष वेधून घेतलं. दिवसभरात घडलेल्या या घडामोडींचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
तरुणांची गर्दी..
हातात तिरंगा घेतलेले आंदोलक.
वेगवेगळे फ्लेक्स, साईन बोर्ड्स आणि मिम्सची रेलचेल..
आणि ज्ञानेश कुमारांना पदावरून हटवण्याच्या घोषणा..
कॉक्रोच जनता पार्टीनं शिवाजी पार्कवर आयोजित केलेल्या आंदोलनात असं चित्र दिसलं.
All Shows































