राज्यपालांच्या सूचनांना मुख्यमंत्र्यांकडून बगल? राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं काय उत्तर?
राजू सोनावणे
Updated at:
02 Jul 2021 11:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रानेच उत्तर दिलं आहे. भगत सिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधीमंडळ अधिवेशनाचा कालावधी, विधानसभा अध्यक्ष निवड, ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलणे हे मुद्दे उपस्थित केले होते. त्या पत्राला आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. या पत्रात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तरं दिली आहेत.