ABP News

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहिती

Continues below advertisement

Ashok Dhodi : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहिती

पालघर:
बारा दिवसापासून अपहरण झालेल्या शिवसेना शिंदे गटाचे डहाणू विधानसभा संघटक अशोक धोडी (Ashok Dhodi) यांच्या तपासासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. अशोक धोडी यांची गाडी आणि मृतदेह गुजरातच्या भिलाडमधील सरिगाम माला फलीया येथील एका बंद पडलेल्या खदानीमध्ये मिळून आली आहे. दरम्यान गेल्या बारा दिवसापासून तपास घेत असलेल्या पालघर (Palghar)  पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेला अखेर यश आले आहे. तर ज्या पद्धतीने माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केलीय, त्यांनाही तशाच प्रकारची शिक्षा व्हावी, अशी मागणी अशोक धोडी यांच्या मुलाने केली आहे. सोबतच आमच्या जीवालाही धोका असल्याची भीती मृत अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी याने व्यक्त केले आहे.   

दरम्यान,  गेले बारा दिवस पोलीस यंत्रणा या तपासाच्या मागे होती. त्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर तपास सुरू असताना चार आरोपी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे. या प्रकरणी  अजूनही तीन आरोपी फरार असून त्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा सर्व उलगडा होईल. अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram