Chhatrapati Sambhajinagar Special Report Dowry : आणखी किती वैष्णवी? हुंड्यांसाठी छळ कधी थांबणार?
Chhatrapati Sambhajinagar Special Report Dowry : आणखी किती वैष्णवी? हुंड्यांसाठी छळ कधी थांबणार?
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून अशा अनेक घटना हळूहळू बाहेर येऊ लागल्या.. लक्ष्मीच्या पावलाने ज्या सुनेला घराचा उंबरा ओलांडून आणलं जातं त्याच लक्ष्मीला पैशांच्या रुपातील लक्ष्मीसाठी छळलं जातं.. तिला चटके देऊन, दोरीने बांधून तिला मरणयातना दिल्या जातात. हे सगळं चीड आणणारं आहे.. छत्रपती संभाजीनगरमधूनही अशीच एक हुंडाबळीची घटना समोर आलीये.. पाहूया नेमकं काय घडलंय.
क्रौर्याची परिसीमा गाठणारी माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या चौकावाडीतील आणि या जाचाचं कारण आहे हुंडा
२५ लाखांची मागणी करत अख्खं कुटुंब या महिलेला मारहाण करत होतं नवरा अजिम शेख, नणंद शबाना निसार शेख, दुसरी नणंद रिजवाना ईमरान शेख सासू, दीर, सगळेच जण अगदी तिच्या जीवावर उठले
हा सगळा घटनाक्र ऐकून तुमच्याही नजरेसमोर वैष्णवी हगवणे आली ना? कारण तिथेही खरी व्हिलन नणंद होती आणि इथेही तेच चित्र पहायला मिळतंय आठ वर्षाचा संसार आणि पैशांच्या लालसेपोटी त्या संसाराची झालेली राखरांगोळी डोळ्यात संसाराची स्वप्न बघून सुरु केलेलं हे नवं आयुष्य नरकापेक्षाही वाईट असेल असं या पीडित महिलांना वाटलंही नसेल... वारंवार होणारा हा अत्याचार सहन न होणाऱ्या वेदनांमधून आत्महत्येसारखं उचललेलं टोकाचं पाऊल आणि आयुष्याची झालेली राख हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे एक मुलगी म्हणून एक सून म्हणून आणि एक आई म्हणून आशेने सरकारकडे, न्यायव्यवस्थेकडे पाहणाऱ्या त्या प्रत्येकीला आतातरी न्याय मिळेल का? कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजी नगर
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























