Car Accident Maharashtra : मर्डरचा नवा पॅटर्न, 'घाल गाडी, टाक संपवून' ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCar Accident Maharashtra : मर्डरचा नवा पॅटर्न, 'घाल गाडी, टाक संपवून' पाहा स्पेशल रिपोर्ट
हे देखील वाचा
Sharad Pawar: शरद पवार विठुनामाच्या गजरात दंग होणार, लेक अन् नातवासोबत पंढरीच्या वारीत बारामती ते सणसर पायी चालणार
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यंदाच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी होणार आहेत. शरद पवार हे 7 जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांसोबत (Ashadhi Wari) चालणार आहे. तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यात (Tukaram Maharaj Palkhi) शरद पवार बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत (Baramti To Sansar) पायी चालत सहभागी होणार आहे. या पायी वारीत नातू युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आणि लेक सुप्रिया सुळेदेखील (Supriya Sule) सहभागी होणार आहे.
पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम राबविला जातो. साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत. 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम गेली दहा वर्षे राबविला जात आहे. यंदाचे अकरावे वर्ष आहेय यंदा संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात 7 जुलै रोजी शरद पवार बारामती ते सणसर हे अंतर चालणार आहेत.