ABP Majha Headlines : 11 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा पंधराशेचा हप्ता मिळायला सुरुवात...पण नवीन नोंदणीचा अजून निर्णय नाही, आदिती तटकरेंची एबीपी माझाला माहिती...

राज्य सरकारकडून मुंबई मेट्रोला भरघोस निधी.. मुंबई, ठाणे, पुणे मेट्रोसाठी २७२ कोटी रुपये वितरीत, मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न

पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अनेक मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती...गैरप्रकार खपवून घेणार नाही, बावनुकळे, संजय शिरसाट आणि योगेश कदमांकडून अधिकाऱ्यांना तंबी...'

महसूलमत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या बंगल्याची अदलाबदल होण्याची शक्यता...गोपीनाथ मुंडेंच्या वास्तव्यामुळे पंकजांची रामटेकला पसंती असल्याची चर्चा...

थंडीच्या कडाक्यात देशभरात नातळाची धूम...ख्रिसमससाठी सजल्या बाजारपेठा...मुंबई आणि वसईतल्या चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकूनही नेमबाज मनू भाकर खेलरत्न शिफारसीपासून वंचित, वाद वाढल्यानंतर नावं फायनल नसल्याची सारवासारव तर देशासाठी खेळते पुरस्कारासाठी नाही, मनु भाकरचं स्पष्टीकरण

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram