Special Report | बोगस नंबर प्लेटचा थेट Sunny Leone ला फटका
![ABP News ABP News](https://vodcdn.abplive.in/2021/02/131bbf59acf16f4f78c1a16651ed0458.jpg)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मुंबई पोलिसांनी कल्याण येथील एका व्यावयायिकावर अभिनेत्री सनी लियोनीच्या गाडीचा क्रमांक वापरल्याबद्दल अटक केली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2020 मध्ये वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ई-चलन आले होते. परंतु त्या पत्त्यावर सनी त्या वेळी उपस्थित नव्हती, ही बाब लक्षात आल्यानंतर पती डॅनिअल वेबर यांच्या मॅनेजरने या विषयी जुहू पोलिस स्थानक आणि वरळी वाहतूक विभागात तक्रार केली होती.
डीएन नगर वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 2 वाजता सनी लियोनीचा गाडी ड्रायव्हर अकबर खानने त्यांच्या गाडीप्रमाणे दिसणारी एक गाडी वर्सोवा परिसरातील एका हॉस्पिटल जवळ पाहिली. ज्या गाडीवर सेम क्रमांक होता. त्यानंतर डीएन नगर वाहतूक विभागातील कॉन्सटेबल या ठिकाणी गेले. ततर दोन्ही गाडीवर सेम क्रमांक असल्याचे आढळले.