Uddhav Thackeray on Operation Tiger : उद्धव ठाकरे यांची 'ती' रणनीती ऑपरेशन टायगर मोडून काढणार?

Continues below advertisement

मुंबई: मागील काही दिवसांपासून शिंदेंच्या (Eknath Shinde) सेनेच्या ऑपरेशन टायगर (Operation Tiger) ची चर्चा आहे. ठाकरेंच्या सेनेतले माजी आमदार पदाधिकारी ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेसोबत जात आहेत. आता पक्षातले हेच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणि शिंदे सेनेचा ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून विशेष रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे. यासाठी पक्षातील नेते, उपनेते,सचिव यांना विशेष जबाबदाऱ्या देऊन पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचा काम केला जाणार आहे. दरम्यान शिवसेनेकडून नेमकी काय रणनीती आखली जातीये हे बघणे ही महत्वाचे ठरणार आहे.  

माजी आमदार राजन साळवी यांचा शिंदे गटात झालेला प्रवेश, त्यानंतर कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत झालेला प्रवेश. माजी आमदार सुभाष बने यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत झालेला प्रवेश. त्यानंतर मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा आणि माजी नगरसेवकांचा शिंदे यांच्या शिवसेनेत झालेला प्रवेश. पक्षाला नेत्यांसोबत पदाधिकारी जात असल्याचा धक्का बसत असताना आपला जुना शिवसैनिक आपल्या सोबत टिकून राहावा आणि पक्ष अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची धावाधाव सुरू झाली आहे. बैठकांवर बैठकांचा सपाटा यासाठी सुरू आहे. आता हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या पहिल्या, दुसऱ्या फळीतील नेत्यांवर याची विशेष जबाबदारी टाकली असल्याचं कळतंय....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola