Bhavana Gawali vs Vinayak Raut : ठाकरे - शिंदे राडा थेट अकोला रेल्वे स्टेशनवर Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई: अकोल्याहून विदर्भ एक्स्प्रेसनं मुंबईच्या दिशेनं निघत असताना शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्या अंगावर आले, असा आरोप शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आपल्याविरोधात घोषणाबाजी करण्यासाठी खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांनी चिथावलं असाही आरोप खासदार गवळी यांनी केला आहे.
यासंबधी बोलताना खासदार भावना गवळी म्हणाल्या की, अकोल्याहून एक्सप्रेसमध्ये बसत असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी माझा अंगावर आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या कार्यकर्त्यांना आमदार नितीन देशमुख व विनायक राऊत यांनी चिथवलं. हे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. हे कृत्य त्यांच्या कुटुंबियांबाबत झालं असतं तर चाललं असतं का? मी याबाबत पोलिसात तक्रार केली आहे.