Bharat Gogawle on Palakmantripad : पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षात धुसफूस सुरूच Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
निवडणुकांपूर्वी जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा
((शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या एकत्र बैठकीचे व्हिज्युल्स))
विधानसभा जिंकल्यानंतर मुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपदावरून झालेले रुसवे-फुगवे
((राज्यपालांना सत्तास्थापनेचं निमंत्रण द्यायला गेले))
खातेवाटपावरून झालेली चढाओढ
((शपथविधीनंतर सगळ्यांनी एकत्र फोटो काढला ते व्हिज किंवा शपथवि))
या सगळ्या राजकीय धुसफुसीचे रेकॉर्ड मोडले ते रायगडच्या पालकमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादानं...
पालकमंत्रीपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरु असलेला सुप्त वाद थांबायची चिन्ह दिसत नाहीयत. त्याची एक झलक जिल्हा वार्षिक नियोजन बैठकीत पाहायला मिळाली. अर्थमंत्री अजित पवारांनी रायगड जिल्ह्याचा आढावा घेतला. या बैठकीसाठी आदिती तटकरे दादांच्या दालनात उपस्थित होत्या. मात्र ही बैठक शिवसेनेच्या आमदारांविनाच पार पडली. मंत्री गोगावले सुद्धा उपस्थित नसल्यानं सेनेला डावलल्याची वेगळीच चर्चा सुरु झाली. सेनेच्या आमदारांनी नाराजी बोलून सुद्धा दाखवली
२ विंडो बाईट - दळवी, थोरवे सेना आमदारांचे बाईट
Y:1102RAIGADmahendra dalvi byte
Y:1102RAIGADmahedndra thorve byte)
व्हिओ-२
मंत्री भरत गोगावले रायगडावर भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांसोबत धारातीर्थ यात्रेला उपस्थित होते.
बैठकीचं आमंत्रण होतं पण रायगडावरील कार्यक्रमामुळे पोहोचू शकलो नाही अशी कबुली गोगावलेंनी दिली.
बाईट-भरत गोगावले
((Z:1102RAIGADbharat gogavle byte
अजित दादांनी बोलावलेल्या बैठकीला फक्त मंत्र्यांना निमंत्रण होतं
इतर आमदारांना बोलावलं नव्हतं
मी रायगडावर असल्याने मी जाऊ शकत नव्हतो..
आमच्या सोबत पाच आमदार या कार्यक्रमाला होते..
म्हणून मी बैठकीला उपस्थित नव्हते ))
व्हिओ-३
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकारची बाजू सावरुन घेतली. तर बैठकीनंतर अर्थमंत्री अजित पवारांनीही सगळे गैरसमज दूर केले. दादांनी सुरुवातीला माध्यमांवरच त्रागा केला. नंतर अशा बैठकीच्या नियोजनाचं प्रयोजन सविस्तरपणे सांगितलं. या बैठकीचा आणि पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या वादाचा संबंध नसल्याचंही दादांनी ठासून सांगितलं.
२ विंडो बाईट - एकनाथ शिंदे+ अजित पवार ((
(R MUM MANTRALAY LIVE 10AM 110225
आज पालकमंत्र्यांची बैठक नव्हतीच
आज रायगड जिल्हा नियोजनाबाबत बैठक होती
आमदारांनी त्यांच्या भागाती सूचना द्याव्यात, त्यांच्या भागातील प्रश्नांबाबत चर्चा होईल, अर्थसंकल्पात मुद्दा ठेऊ
R MUM AJIT PAWAR LIVE 7PM 110225, R WHSUP AJIT PAWAR LIVE 110225 -
बैठकीला आमदारांना बोलावलं नव्हतं.. दोन मंत्र्यांना बैठकीला बोलावलं होतं
जिल्ह्याचे वार्षिक आराखडा बनवण्यासाठी बैठक होती
गोगावले आणि आदिती तटकरेंना बोलावलं होतं.. ))
व्हिओ क्लोज
रायगड असो की नाशिक दोन्ही ठिकाणी पालकमंत्री पदावरुन अजूनही तिन्ही पक्षात एकवाक्यता नाही.
आजच्या वार्षिक नियोजन बैठकीवर त्याचं सावट स्पष्ट दिसत होतं.
मात्र पालकमंत्रिपद मिळालं नाही म्हणून नियोजन समितीच्या बैठकीला दांडी मारणं हा मतदारांचा अपमान नाही का?
राजकीय वादात जिल्ह्याचं नियोजन दावणीला लावणं कितपत योग्य आहे?
मतदारांनी विकासासाठी निवडून दिलंय की फक्त पदं उपभोगण्यासाठी?
याचा विचार लोकप्रतिनिधी करतील अशी आशा ठेवणं पण चुकीचं ठरू शकत इतकी परिस्थिती चिघळत चाललीय
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा