Rinku Rajguru Kolhapur | कोल्हापुरात आर्ची आली, फोटोमुळं चर्चा झाली! Special Report
यूट्यूबवर तब्बल सहा लाखांहून अधिक सबस्क्रायबर असलेला, खासदार धनंजय महाडिकांचा मुलगा पण इन्फ्लूएन्सर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केलेला कृष्णराज महाडिक चर्चेत आलाय. आणि त्याला कारण ठरलंय आर्ची अर्थात रिंकू राजगुरुसोबतचा फोटो.. काय आहे नेमकं हे प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून.
आर्चीच्या एन्ट्रीने जसा सिनेमा गाजला
तशीच आर्चीची एन्ट्री पुन्हा चर्चेत आलीये
पण हा सिनेमा नाही
तर ही सत्यघटना आहे
कोल्हापुरात आर्ची आली
आणि सोशल मीडियावर चर्चेचा पूर आला
अर्थात त्याला कारण ठरलाय हा फोटो
((आर्ची आणि कृष्णराज महाडीकचा फोटो))
त्याचं झालं असं की काही कामानिमित्त
आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु कोल्हापुरात आली होती
यावेळी खासदार धनंजय महाडिकांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक आणि रिंकूची भेट झाली
दोघांनीही अंबाईचं दर्शन घेतलं
त्यावेळी काढलेला हा फोटो
आता चर्चेचा विषय बनलाय.
या फोटोवरून जो तो महाडीक कुटुंबातील प्रत्येकाला छेडतोय आणि फोटोमागची इनसाईड स्टोरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय...
फोटो सोशल मीडियावर शेअर करून चूक तर केली नाही ना अशी भावना महाडिक कुटुंबीय व्यक्त करताहेत
एवढंच काय, तर दिल्लीत अधिवेशनात व्यस्त असलेल्या धनंजय महाडिकांची देखील या फोटोनं पाठ सोडली नसल्याचं कळतंय..
दिल्लीत देखील त्यांना या फोटोवरून संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावं लागतंय.
बरं या फोटोची जास्त चर्चा होण्याचं एक कारण हा व्हीडिओ देखील आहे
17 व्या मिनिटापासून पण मला विचारा मी सांगेन तेवढाच घ्या))
आता धनंजय महाडिकच म्हणतायत
धाकल्याचं लग्न करायचंय
म्हणून नेटकऱ्यांनाही वाटलं असेल
महाडिकांना सून सापडली
आता कोल्हापूरकरांचा हा अंदाज खरा की खोटा ते महाडिकरावांनाच माहिती...
असो.. या निमित्ताने इन्फ्लूएन्सर कृष्णराज महाडीक
आणखी चर्चेत आले हे नक्की
एन्ड पिटीसी विजय केसरकर, कोल्हापूर