Beed : आंदोलन टाळण्यासाठी महाकाय वृक्षाचा बळी, बीड जिल्हाधिकारी प्रशासनाचं संतापजनक कृत्य
गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड
Updated at:
13 Feb 2022 10:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणारे लिंबाचं झाड प्रशासनाची डोके दुखी ठरत होती. आज अखेर या झाडावर तोडक कारवाई करण्यात आली आहे. अचानक कारवाई केली जात असल्यानं वृक्ष प्रेमींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी याला रोखले होते. मात्र अखेर या झाडावर कुऱ्हाड चालवण्यात आली. या झाडावर चढून अनेक आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे ही कारवाई झाली आहे, याच कारवाईला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे.