Aryan Khan : 26 दिवसांनंतर आर्यनला 'मन्नत'चं दर्शन ; दिवाळीआधी मन्नतबाहेर फटाके Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतब्बल २६ दिवस कोठडीत घालवल्यानंतर आज आर्यन खाननं आपल्या घराचा चेहरा पाहिला. आर्थर रोड कारागृहातून सुटलेला आर्यन खान वाहनांच्या ताफ्याच्या गराड्यात मन्नत बंगल्यावर पोहोचला. क्रूझ पार्टी प्रकरणी एनसीबीनं २ ऑक्टोबरला आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं..त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तेव्हा पासून आर्यनला जामीन मिळावा म्हणून अनेक प्रयत्न झाले. नामवंत वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. मात्र प्रत्येक वेळी या-ना त्या कारणानं आर्यनचा जामीन नाकारण्यात आला. अखेर परवा आर्यन खानला उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. मात्र कागदपत्रांची पूर्तता होऊ न शकल्यानं आर्यनची कारागृहातली सुटका पुन्हा लांबली होती. अखेर आज सकाळी अकरा वाजता आर्यन खानची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली. तिकडे मन्नत बंगल्याबाहेर शाहरुख खानचे चाहते सकाळपासूनच आर्यन खानची वाट पाहत होते. आर्यन मन्नत बंगल्यावर दाखल होताच फटाके फोडून त्याचं स्वागत करण्यात आलं.