Sharad Pawar-Uddhav Thackeray : शरद पवार आणि उद्धव ठाकरे पराभूत उमेदवारांसोबत करणार चिंतन

Continues below advertisement

Sharad Pawar-Uddhav Thackeray : शरद पवार आणि उद्धव ठाकरे पराभूत उमेदवारांसोबत करणार चिंतन

ही बातमी पण वाचा

30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल

सोलापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालातून महाविकास आघाडीचं (Mahavikas aghadi) पाणीपत झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीने तब्बल 236 जागांवर विजय मिळवला असून महाविकास आघाडीला केवळ 49 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालंय. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकलेल्या 10 जागांपैकी 4 जागा एकट्या सोलापूर जिल्ह्यातून जिंकल्या आहेत. त्यामध्ये, माढा, माळशिरस आणि मोहोळ मतदारसंघातून तीन नवे चेहरे राष्ट्रवादीचे आमदार बनले आहेत. तर, करमाळ्यातून नारायण पाटील हे माजी आमदार पुन्हा विधानसभेत पोहोचले आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यात सर्वात लक्षवेधी लढत ठरलेल्या माढा मतदारसंघात यंदा 6 टर्म आमदार राहिलेल्या बबन शिंदे यांच्या पुत्राचा पराभव करत अभिजीत पाटील आमदार बनले आहेत. 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडल्याचं सांगत, मतदारांनी शेतकऱ्याच्या मुलाला आशीर्वाद दिल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

मतदारांनी आशीर्वाद दिला, 30  वर्षाची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली आणि आमदार झालो. त्यामुळे, हा गुलाल लवकर उतरणार नाही, असे म्हणत माढा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांनी विजयावर प्रतिक्रिया दिलीआहे. माढ्याची निवडणूक जनतेने हातात घेतली होती, आणि शेतकऱ्याच्या मुलाला निवडून दिलं. गेली 30 वर्ष इथे दुसऱ्यांची सत्ता होती, मी पहिल्यांदाच आमदार झालो आहे, त्यामुळं मला राज्याचा अभ्यास करावा लागेल असेही पाटील यांनी म्हटलं. दरम्यान, माढा विधानसभेत बबन शिंदे हे गेल्या 6 टर्मचे आमदार होते. पण, यंदा वयाच्या ज्येष्ठत्वामुळे त्यांनी निवडणूक लढवण्याऐवजी पुत्राला मैदानात उतरवलं होतं. मात्र, त्यांचा पराभव झाला.    

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram