Antilia Explosives Scare | काय आहे सचिन वाझे यांचं इनोव्हा कार कनेक्शन? Special Report
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Mar 2021 10:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुकेश अंबानींच्या घराबाहेर एक स्कॉर्पिओ सापडते. त्यात जिलेटिनच्या २० कांड्या सापडतात. प्रकरणाला दहशतवादी वळण लागलं. स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरण यांचा मृत्यू होतो. नंतर प्रकरण पूर्णपणे एपीआय सचिन वाझेंभोवती येतं..त्यांना पुन्हा पोलीस दलातून निलंबित केलं जातं. अशा अनेक घटना गेल्या २० दिवसांमध्ये घडल्यात. त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. मात्र ज्या सचिन वाझेंकडे प्रकरणाचा तपास होता, त्याच प्रकरणात सचिन वाझे आरोपीच्या पिंजऱ्यात अडकलेत. आणि याला कारण ठरली एक इनोव्हा कार.
काय आहे या इनोव्हा कार आणि सचिन वाझेंचं कनेक्शन? पाहूयात.