Amravati Artist : दिव्यांग चित्रकार युवराजने गाठलं यशाचं शिखर, आतापर्यंत 45 पुरस्कारांनी सन्मान
अमरावतीच्या ढगा गावातील युवराज ठाकरे हा जन्मापासून दोन्ही पायाने दिव्यांग असून सुद्धा त्याच्या आवडत्या चित्रकला विषयांमध्ये निपुण आहेत. त्याच्या चित्रकलेला संपूर्ण भारतामध्ये आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या चित्रकलेच्या माध्यमातून ते गेल्या काही वर्षांपासून वरुड शहरांमध्ये उडान फाईन आर्ट अकॅडमी या नावाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करीत आहेत. युवराजने आत्तापर्यंत दिल्ली, मुंबई, नागपूर, पंजाब, पुणे यासह विविध ठिकाणी त्यांनी जाऊन अनेक पुरस्कार स्विकारले आहेत. त्याचा चित्रकलेतील प्रवास आणि निरंतर कार्य पाहून त्यांची आसाम बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद करण्यात आली तर त्याला एक्स्क्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड हा सन्मान देऊन सुद्धा गौरविण्यात आले. कोण आहे हा युवराज पाहूया या रिपोर्ट मधून...
All Shows

































