Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील चुकीची कबुली, भरपाईचं काय? Special Report
लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांनी नुकतीच दिलेली कबुली सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलंय. अनेक सरकारी कर्मचारी आणि अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेतील कोट्यवधी रुपये लाटल्याचं उघड झाल्यानंतर आता अर्थमंत्री अजितदादांनी चूक कबूल केलीय. मात्र जनतेच्या करातून झालेल्या या उधळपट्टीचा हिशेब कोण देणार, या चुकीला शिक्षा होणार का, यासारखे अनेक प्रश्नही उपस्थित झालेत. याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेली योजना.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला आधार दिलेली योजना.
महाराष्ट्राच्या तिजोरीवर सर्वाधिक भार पडणारी योजना.
इतर खात्यांचा निधीही वळवण्याची गरज पडणारी योजना..
अशा या योजनेवरून गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचं राजकारण आणि अर्थकारण ढवळून निघाल्यानंतर आता खुद्द अर्थमंत्री अजित पवारांनी एक मोठं कन्फेशन दिलंय.
१ जुलै २०२४ या दिवशी शिंदे सरकारनं वाजतगाजत या योजनेची औपचारिक घोषणा केली होती.
तर १ जून २०२५ ला म्हणजेच बरोबर ११ महिन्यांनी अजितदादांनी चूक मान्य केलीय.
या काळात चुकीच्या आणि बोगस लाभार्थ्यांवर जनतेच्या कराचे जे कोट्यवधी रुपये उधळले गेले, त्याला जबाबदार कोण, त्याची भरपाई कुणाकडून करणार, हा प्रश्न त्यामुळं निर्माण झालाय.
अजितदादांनी चूक तर मान्य केलीय.
आता या चुकीचं सरकार काय प्रायश्चित्त घेणार आणि ही चूक जनता माफ करणार का, हे आगामी निवडणुकीतच स्पष्ट होईल.
All Shows

































